Sunday, February 21, 2010

दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पुण्या सारख शांत शहर ढवळून निघाल.जर्मन बेकरी येथे बॉम्ब स्फोट झाले आणि आम्हालाही समजल कि आम्ही किती असुरक्षित आहोत ते!आत्ता पर्यंत मुंबई मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले कि आम्हाला वाईट तर खूप वाटायचं पण कुठे तरी मनात अस यायचं कि निदान आपल्या पुण्यात तरी असे धोके आपल्याला नाहीत.अहो अगदी मा.इंदीरा गांधी यांची हत्या झाल्या वर सगळ्या देशात दंगली उसळल्या तरी आमच पुन शांत होत.संयमाने वागणाऱ्या आम्हा पुणेकरांना दहशतवाद,अहिंसा,जाळपोळ असल्या वातावरणाची कधी सवयच नाहीये हो!आमच्या लेकी सुना अगदी रात्री १२ वाजता सुद्धा रस्त्यावरून एकट्या ये जा करू शकत होत्या अगदी आत्ता आत्ता पर्यंत!मग कसे कधी कुठे काय बदलत गेले?शिक्षणाचे माहेरघर दहशतवादाचे सासर कसे काय बनले?आम्ही कायम अतिथी देवो भव! असे म्हणत आमच्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे,पर्यटकांचे स्वागतच करत राहिलो.अजूनही करूच.आमचे संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही!पण पाहुणे म्हणून येणार्यांनी असे समजू नये कि आम्ही भ्याड आहोत,हातात बांगड्या भरून बसणारे आहोत.आम्ही शिवरायांच्या पुण्यभूमीत त्यांचे संस्कार रक्तात बाळगणारे त्यांचे मावळे आहोत.अटके पार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांचे आम्ही शिलेदार आहोत.तेव्हा पाहुणे बनून या,पाहुणचार घ्या आणि मानाने परत जा!आमच्या ताटात खाउन आमच्याच ताटात घाण करायचे काम करू नका!आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आपण सजग राहून आपलाच रक्षण करण्याची वेळ आता आली आहे,तेव्हा खरो खर पक्षभेद न करता सर्वांनी एकत्र येऊन आपण या दहशतवाद रुपी राक्षसाचा संहार करूया.हीच खरी श्रद्धांजली असेल जर्मन बेकरी मध्ये मरण पावलेल्या आपल्या लोकांसाठी!नुसत्या मेणबत्त्या पेटवून काही होणार नाही आपल्या हृदयात ती ज्योत तो अंगार पेटू द्या जो दहशतवादाशी लढा देण्याचे बाल आपल्याला देईल!जय हिंद!जय महाराष्ट्र!

1 comment:

  1. *संयमाने वागणाऱ्या आम्हा पुणेकरांना दहशतवाद, हिंसा, जाळपोळ असल्या वातावरणाची कधी सवयच नाहीये हो!

    ReplyDelete