Monday, February 22, 2010
आज मुक्तापीठ पुरवणी मधे "माता न तू वैरिणी" या नावाचा लेख वाचला.त्यातली नेहाची व्यथा ही थोड्या फार प्रमाणात आजकालच्या सगळ्याच नविन मुलामुलींची व्यथा आहे.इथे ती नविन लग्न करुन सासरी गेलिये पण तिच्या आई च्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये.वीकेंड ला एक दिवस तिने आपल्या सोबत घालवावा अस तिच्या आई ला वाटत. तर आठ दिवसातून मिळालेली दोन दिवसांची सुट्टी तिने आपल्याच सोबत घालवावी अस त्याला वाटत आहे.लेखात नसलेली एक बाजु माला अशी वाटते की थोड्या फार प्रमाणात सासु च्या ही अशाच कही अपेक्षा असतील की तिने हे दोन दिवस घरात लक्ष द्याव.माला जरा मोकला वेळ मिळावा.माला अस वाटत की यात खर तर कोणीच चुकत नाहीये.नेहाच्या आई ने जर सार आयुष्य नेहाच्या भोवती तिला समृद्ध करण्या साठी घालवल असेल तर आता त्याना खुप एकट वाटत असणार.म्हणून त्या थोड्या सैरभैर झाल्या असणार.एकटे पडण्याच्या भीतीने त्या तसा वैताग व्यक्त करत असतील.थोड नेहानी त्याना प्रेमाने समजवन्याची व त्यानी पण थोड समजुन घेण्याची गरज आहे.आज काल मुलांच्या बरोबरीने मुली घराबाहेर पडून प्रसंगी शिफ्ट मधे कम करत आहेत.आपल घरकुल जास्तीत जास्त सुरक्षित,जास्तीत जास्त सुखासोयिनी समृद्ध करण्या साठी जिवापाड महेनत करत आहेत.तिथे त्यांच्या कामा मधे कुठे ही एक स्त्री म्हणून कोणतीही सवलत त्याना मिळत नाही.आय.टी.इंडस्ट्री मधे तितक्याच तनावा खाली या मुली काम करत असतात.मुलां इतकाच पगार कमावत असतात.पण घरी आल्यावर सुद्धा त्यांची कोणती न कोणती ड्यूटी चालूच असते.बायकोची,आईची,सुनेची,वहिनीची!प्रत्येकांच्या अपेक्षा अगदी हसतमुख पणे तिने पूर्ण कराव्यात अस प्रत्येकालाच वाटत रहत.पण तिच्या के अपेक्षा आहेत?हा विचार कोणीच करत नाही.आता कोणाच्या अपेक्षा पण चुकीच्या नाहीत,तिने घराबाहेर पडून काम करण ही चुकिच नाही.मग चुकते कुठे?आपण मध्यंतरी आय.टी.मधल्या कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्याच पेपर मधे वाचले आहे.करण काय तर वाढता ताण-तणाव! मग कामाच्या ठिकानाचा ताण,घरचा ताण,शारीरिक त्रास हे सगळ सहन करुन या मुली परत जिद्दीने उभ्या रहातच आहेत.तेव्हा आजकालच्या आयांनी हो अयाच म्हणते मी करण सासुनी सुद्धा आईची जागा घेउन हा विचार करावा आणि आपल्या मुलींना,सुनांना समजून घेउन त्यांच्या पंखात बळ द्याव.त्याना घरी तरी मुक्त जगता येइल अस वातावरण तयार काराव!या पेक्षा अजुन काय सांगू?नक्की विचार कराच!
Sunday, February 21, 2010
दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पुण्या सारख शांत शहर ढवळून निघाल.जर्मन बेकरी येथे बॉम्ब स्फोट झाले आणि आम्हालाही समजल कि आम्ही किती असुरक्षित आहोत ते!आत्ता पर्यंत मुंबई मध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले कि आम्हाला वाईट तर खूप वाटायचं पण कुठे तरी मनात अस यायचं कि निदान आपल्या पुण्यात तरी असे धोके आपल्याला नाहीत.अहो अगदी मा.इंदीरा गांधी यांची हत्या झाल्या वर सगळ्या देशात दंगली उसळल्या तरी आमच पुन शांत होत.संयमाने वागणाऱ्या आम्हा पुणेकरांना दहशतवाद,अहिंसा,जाळपोळ असल्या वातावरणाची कधी सवयच नाहीये हो!आमच्या लेकी सुना अगदी रात्री १२ वाजता सुद्धा रस्त्यावरून एकट्या ये जा करू शकत होत्या अगदी आत्ता आत्ता पर्यंत!मग कसे कधी कुठे काय बदलत गेले?शिक्षणाचे माहेरघर दहशतवादाचे सासर कसे काय बनले?आम्ही कायम अतिथी देवो भव! असे म्हणत आमच्या शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे,पर्यटकांचे स्वागतच करत राहिलो.अजूनही करूच.आमचे संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही!पण पाहुणे म्हणून येणार्यांनी असे समजू नये कि आम्ही भ्याड आहोत,हातात बांगड्या भरून बसणारे आहोत.आम्ही शिवरायांच्या पुण्यभूमीत त्यांचे संस्कार रक्तात बाळगणारे त्यांचे मावळे आहोत.अटके पार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांचे आम्ही शिलेदार आहोत.तेव्हा पाहुणे बनून या,पाहुणचार घ्या आणि मानाने परत जा!आमच्या ताटात खाउन आमच्याच ताटात घाण करायचे काम करू नका!आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आपण सजग राहून आपलाच रक्षण करण्याची वेळ आता आली आहे,तेव्हा खरो खर पक्षभेद न करता सर्वांनी एकत्र येऊन आपण या दहशतवाद रुपी राक्षसाचा संहार करूया.हीच खरी श्रद्धांजली असेल जर्मन बेकरी मध्ये मरण पावलेल्या आपल्या लोकांसाठी!नुसत्या मेणबत्त्या पेटवून काही होणार नाही आपल्या हृदयात ती ज्योत तो अंगार पेटू द्या जो दहशतवादाशी लढा देण्याचे बाल आपल्याला देईल!जय हिंद!जय महाराष्ट्र!
The First Blog...
नमस्कार मंडळी! माझ्या blogवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मन-मोकळेपणाने वाचा आणि मन-मोकळेपणाने लिहा... तुमच्या मनातल्या गोष्टी असोत; घराभोवतीच्या, आसपासच्या असोत; किंवा पार परदेशांतल्या असो! बिनधास्त share करा... आणि मन मोकळे करा...
Subscribe to:
Posts (Atom)